माणूस आजवर चुकतमाकतच जगत आलाय. मेंदूच्या ज्या मर्यादा त्या माणसाच्या आकलनाच्याही मर्यादा. मग काय झाले? सुख शोधत जाताना आपणच काही अन्याय, यातना निर्माण केल्या. या जगी सर्वात सुंदर आहे ते माणसाचे मन आणि सर्वात कुरूप आहे तेही माणसाचे मनच. भव्य, देखण्या व प्रचंड वास्तू मानवी प्रतिभेची उत्तुंग भरारी दाखवतात. पण प्रत्येक चिरा-वेठबिगारांचे अश्रू, घाम-रक्त यांचे गळणे, पाठफोडू फटके ऐकवत राहतात. स्वातंत्र्यामागे बलिदाने असतात. साम्राज्यामागे शोषण, लूटमार असते. नीग्रो गुलाम आणि रेड इंडियन यांच्या शोषण आणि कत्तलीमधून अमेरिकेची श्रीमंती उभी राहिली आहे.
मुद्दा असा की आपण चुका करीत आलो आहोत. जातपात, उच्च -नीच भाव, जवळचा-दूरचा, शत्रू-मित्रभाव या गोष्टी जीवन बकाल करीत आले. माणसातली आई, बाबा, भाऊ, लेकरु, सखासोबती आपणास नेहमीच नाही ओळखू येत! कारण आपण पुरेशा प्रमाणात आपणावरच डोळे नाही रोखत. आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू आहोत हे श्रीकृष्ण बजावत असतो.
चुका करणे माणसाच्या रचनेतच आहे. चुकांची जाणीव ठेवणे. त्या पुन्हा होऊ न देणे - प्रसंगी कबुली देणे हे गंगास्नान आहे. पश्चात्ताप, प्रायश्चित्त, कबूली (Confessions) हे धर्ममार्ग अशा अर्थाने की ते माणसाला कात टाकायला लावतात. काही प्रमाणात पश्चात्तापाची, आत्मचिंतनाची, आत्मसुधारणेची ही तळमळ आज मला सर्वत्र दिसतेय का? मला समाज नावाची वस्तू तरी दिसतेय का?
दूरदर्शनवर आज मराठीतून दोन मालिका चालू आहेत. अंतर्मुख व्हावे अशा योग्यतेच्या! महादेव गोविन्द रानडे आणि त्यांची रमाबाई यांच्या जीवनावर "उंच माझा झोका" ही मालिका आणि विखेपाटील खानदानाच्या मिशाउगारु जगण्यावर मारझोड दाखवणारी नारीछळ मालिका! दोन्ही तुलना करण्यासारख्या आहेत. न्यायमूर्ती रानडे यांचा काल -- स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही. पुनर्विवाह, संपत्तीत वाटा नाही. समान हक्क नाही. विकासाला वाव नाही. ही सनातनी कुबट आणि घुसमट करणारी मालिका पाहताना ब्राह्मण वर्ग अपराधी मनाने, पश्चात्तापाने वरमलेला असतो. तिकडे विखे पाटील दरडावून, मुस्कटात मारून, दंडुका वापरून सुनांना, मुलींना, पशूप्रमाणे छळतात, थोर कूळ आणि अस्सल रक्त सांगतात ते पाहून पश्चात्तापाने होरपळणे किती प्रमाणात घडते याचे उत्तर ज्याचे त्यानी मनाशी द्यावे. दलित स्त्रियावरील बलात्कार, घरेदारे जाळणे, जमिनी हिसकावून घेणे वगैरे अपप्रकारातील बहुजनसमाजाचा मोठा सहभाग मान्य करुन मन खंतावते का? ब्राम्हणेतर चळवळी बद्दल केशवराव जेधे लिहितात "ब्राम्हणेतर चळवळीत राष्ट्रीय वृत्तीला काही वाव नव्हता. बारा वर्षे मी या चळवळीत काढली पण देशाची सेवा करतो असे मला कधीही वाटले नाही". माधवराव बागल खंत व्यक्त करतात "आज अस्पृश्यावरचे अन्याय ब्राम्हण समाजाकडून होत नाहीत. पण आपणच मनुस्मृतीचे पुनर्जीवन करीत आहोत" (भारतीय प्रबोधन ग्रंथ पृष्ठ क्रमांक 221). पश्चात्तापाची अशी भावना आहे आज कुठे? ब्राम्हण पुरुष कापून काढा. स्त्रियाना भोगा --असा ग्रंथ प्रसिद्ध करणारा महामराठा पुढारी किती लोकांना पश्चात्ताप आणि शरम वाटायला लावतो?
"पालावरचे जिणे" हे गिरीश प्रभुणे यांचे भडभडून आणणारे पुस्तक वाचा. पारधी स्त्रियांचे जीणे पारधी पुरुषांनीच कसे असह्य करून सोडलय. मग भटक्या, दलित पुढारलेल्या स्त्री पुरुषांना अपराधी वाटायला नको काय? वाटते का तसे? "आमच्याशी रोटीबेटी व्यवहार करा "असे म्हणणारे लक्ष्मण माने. त्यांची बायको ब्राम्हण कुटुंबातील! तिचे सासरी स्वागत कसे झाले? बायका म्हणाल्या "लक्ष्मणाच्या +++ कड़े बघून ही या घरात आली आहे" हे स्वागत लक्ष्मण माने याना शरम आणते का? निगरगट्टपणा पाहून निराश झालेले ना .ग .गोरे लिहितात "राष्ट्रीय उत्थापनाची आशा बाळगण्याची हिम्मत माझ्या ठिकाणी नाही" (भारतीय प्रबोधन).
" देशाची फाळणी" ही काळजाला घरे पाडणारी दुर्घटना नाही का? पण कोणालाही पश्चात्ताप वाटत नाही. पु. भा. भावे जळत जळत मरुन गेले. "हिंदू मूळचे भ्याड तर मुसलमान गुंड प्रवृत्तीचे" हे मत ठाम पणे सांगणारे गांधीजी मग मुसलमानांच्या नैतिक, शैक्षणिक सुधारणेकडे, त्यांच्या आधुनिकीकरण प्रक्रियेकडे एवढे सुद्धा ध्यान का देत नाहीत? त्याना गुंड आणि उन्मत्त का राहू दिले? मुसलमानांच्या उद्धाराविषयी गांधीजीना काही आस्था का म्हणून नव्हती? वाईट वाटायला नको? बलात्कारित हिन्दू स्त्रियांना गांधीजी म्हणाले "जीभ चावा आणि मरा! आत्महत्त्या करा!!" ज्यू लोकानी सामूहिक आत्महत्त्या करावी म्हणजे हिटलरची जगभर निंदा होईल" हे गांधीजी सांगत होते . याबद्दल काही पश्चात्ताप?
आक्रमक, पिसाटधर्मी वृत्तीच्या लोकांना सुसंस्कृत, राष्ट्रीय वृत्तीचे करण्यासाठी काहीच न करावे असे व्रत घेणारे गांधीजी अन्त्योदयाची कल्पना मांडतात. ती मग कशी साकारणार? "एका दिशेचा शोध" घेणारे संदीप वासलेकर याना वाटते की महात्माजींची अन्त्योदय ही कल्पना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची भौतिक शास्त्राविषयीची निष्ठा यांचे मीलन करून आपल्या देशातील लोक समाधानी, आनंदी होणे शक्य होते. मग सावरकर का मानवले नाहीत? गांधीजीनी त्यांचे का ऐकले नाही? आणि आता वासलेकराना काश्मिरात दहशतवादी तरुण भेटला. वासलेकराना म्हणाला "आमचा मार्ग चुकीचा आहे . मान्य! पण आमची कोंडी झाली आहे. तुमचा मार्ग कोणता? ते सांगा ना?" गांधीजी कोणता मार्ग सांगणार होते?
आता काय करणार? निदान पश्चात्ताप तरी वाटू दे ना? अपयशाची जबाबदारी जे स्वीकारत नाहीत, त्यांना यशातही भागीदार होता येत नाही. आणि पुढील उन्नतीतही ते स्वावलंबी होत नाहीत.
पानवाला.

No comments:
Post a Comment